अमृता फडणवीसांचे नवे गाणे रिलीज


नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे रिलीज करण्यात आले. या गाण्याचे अलग मेरा रंग है..असे बोल आहेत. हे गाणे त्यांनी अॅसिड हल्ल्यातील पीडित महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी गायले आहे. अमृता फडणवीसांचे हे गाणे सध्या सोशल मीडियावर चागलेच गाजत आहे.

अमृता फडणवीसांचे हे गाणे अॅसिड पीडितांसोबत चित्रीत झाले आहे. हे गाणे काही तासांपूर्वी रिलीज झाले आहे. आतापर्यंत 5 लाख, 92 हजार 298 लोकांनी हे गाणे ऐकले आहे. अमृता फडणवीसांचे हे नवे गाणे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रिलीज झाले आहे. या गाण्याची Face can be destoryed but not the soul अशी टॅगलाईन आहे. म्हणजेच केवळ चेहरा नष्ट होऊ शकतो पण मन कधीही नाही, असे या टॅगलाईनवरुन स्पष्ट करायचे आहे. अमृता फडणवीसांनी या गाण्याचे पोस्टरही पोस्ट केले होते. अमृता फडणवीस यांनी या गाण्यामुळे केवळ अॅसिड हल्ल्यातील पीडित महिला नव्हे, तर प्रत्येक महिला या गाण्यामुळे प्रोत्साहित होईल, अशी प्रतिक्रिया दिली.

Leave a Comment