वॉल्सवेगनची 7 सीटर शानदार एसयूव्ही लाँच

वॉक्सवेगनने आपली नवीन एसयूव्ही टिग्युआन ऑलस्पेसला (Tiguan AllSpace) भारतात लाँच केले आहे. ही एसयूव्ही 7 सीटर आहे.       या महिन्याच्या सुरूवातीला कंपनीने या एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केले होते.

टिग्युआन ऑलस्पेस एसयूव्हीमध्ये कंपनीने बीएस6 मानक इंजिन दिले आहे. यात टर्बोचार्ज्ड 2 लीटर टीएसआय पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 190 एचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करते. ही एसयूव्ही 4 मोशन ऑल व्हिल ड्राईव्ह सिस्टमसोबत येते. यात 7 स्पीड डीएसजी ऑटोमेटिक यूनिट ट्रांसमिशन मिळेल.

Image Credited – NDTV

नवीन एसयूव्हीचा लूक बोल्ड असून, यात नवीन एलईडी लाइट्स, आकर्षक डीआरएल देण्यात आले आहे. याच्या ग्रिलमध्ये कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. यात ड्युअल टोन 17 इंच एलॉय व्हिल्स मिळतील.

टिग्युआन ऑलस्पेस एसयूव्हीच्या सुरक्षा फीचर्समध्ये एबीएस, ईबीडी, ईएसपी, 7 एअरबॅग्स, टायर मॉनिटरिंग सिस्टम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा स्टँड्ड मिळेल.

Image Credited – NDTV

एसयूव्हीच्या इंटेरियरबद्दल सांगायचे तर यात अलिशान कॅबिन देण्यात आले आहे. यात भरपूर बूट स्पेस मिळेल. सर्व सीट्ससोबत 340 लीटर सामान ठेवण्याची देखील क्षमता आहे.

ही एसयूव्ही 7 रंगाच्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. भारतात टिग्युआन ऑलस्पेस एसयूव्हीची किंमत 33.12 लाख रुपये आहे.

Leave a Comment