Video : रेल्वेखाली बीएमडब्ल्यू चिरडली गेल्यानंतरही वाचले चालकाचे प्राण

धावणाऱ्या रेल्वेखाली बीएमडब्ल्यू चिरडली गेल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. लॉस एंजिलेस पोलीस विभागने या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, बीएमडब्ल्यूचा चालक सिग्नल बंद असताना देखील रेल्वे ट्रॅकच्या दिशेने गाडी वळवतो व तेवढ्यात वेगाने येणाऱ्या मेट्रो रेल्वेखाली बीएमडब्ल्यू चिरडली जाते.

एवढ्या जबरदस्त अपघातानंतर देखील चालक आश्चर्यकारकरित्या वाचतो. अपघातात चालकाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. हा अपघात दक्षिण लॉस एंजिलेस येथे झाला.

लॉस एंजिलेस पोलीस विभागने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, याचा दुखःद परिणाम देखील झाला असता. सुदैवाने चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र हे आपल्याला सुचवत आहे की, रेल्वे ट्रॅकस जवळ असताना लक्ष द्यावे व नेहमी वाहतूक सिग्नलचे पालन करावे.

ट्विटरवर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, एवढ्या भीषण अपघातानंतर देखील चालक वाचला कसा ? हा प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

पोलीस विभागाचे कमांडर मार्क रेइना यांनी अपघाता चिरडल्या गेलेल्या गाडीचा फोटो शेअर केला आहे.

Leave a Comment