कॅन्सरच्या रुग्णांवर यशस्वी उपचार आणि या घातक आजारावर संशोधन करणाऱ्या दोन प्रसिद्ध भारतीय वंशाच्या डॉक्टरांनी कॅन्सरबाबत भारताला सतर्क केले आहे. डॉक्टर दत्तात्रययुडू नोरी आणि डॉक्टर रेखा भंडारी यांनी भारताला कॅन्सरबाबत चेतावणी देत म्हटले आहे की, जर त्वरित योग्य पावले उचलली गेली नाहीत तर भारतात कॅन्सरीची त्सुनामी येईल.
…तर भारत कॅन्सरच्या विळाख्यात अडकणार
कॅन्सर रोग विशेषज्ञ डॉक्टर दत्तात्रययुडू नोरी यांनी कॅन्सर पीडित अनेक भारतीय नेत्यांवर उपचार केले आहेत. तर डॉक्टर रेखा भंडारी या वेदनाशामक औषधांच्या क्षेत्रात आपल्या संशोधनासाठी ओळखल्या जातात.
दोघांनी सांगितले की, आरोग्य शिक्षण आणि रोगाची सुरूवातीच्या टप्प्यात पेशींमध्ये ओळखच भारताला कॅन्सरच्या त्सुनामीपासून वाचवू शकते.
पद्मश्री पुरस्कारने सन्मानित नोरी म्हणाले की, भारतात दर दिवशी कॅन्सरमुळे 1300 जणांना प्राण गमवावे लागत आहेत. भारतात दरवर्षी कॅन्सरचे जवळपास 12 लाख नवीन केस समोर येत आहेत. हे सुरूवातीच्या टप्प्यात आजाराबाबत माहिती न मिळणे आणि खराब उपचार याकडे इशारा करते.
इंटरनॅशनल एजेंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने देखील भविष्यवाणी केली आहे की, 2030 पर्यंत भारतात दरवर्षी जवळपास 13 लाख नवीन प्रकरण समोर येतील.
दोन्ही डॉक्टरांनी सरकारला कॅन्सर हॉटलाइन, स्थानिक कॅन्सर सेंटर आणि ब्रेस्ट कॅन्सर, सर्वाइकल कॅन्सर सारखे वेगाने वाढणाऱ्या आजारासाठी टास्क फोर्स बनविण्यासारख्या अनेक सुचना दिल्या आहेत.