महिला दिन : या आहेत सर्वाधिक पगार घेणाऱ्या महिला सीईओ

दरवर्षी 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. आज जगभरातील उच्चपदांवर महिला कार्यरत आहे. आज महिला विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने जगातील सर्वात पगार मिळवणाऱ्या टॉप0-5 महिला सीईओंविषयी जाणून घेऊया.

Image Credited – CNBC

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, जगात सर्वाधिक पगार मिळवणाऱ्या टॉप-5 महिला सीईओंमध्ये पाचव्या स्थानी नॅसडेक कंपनीच्या सीईओ एडेना टी फ्रेडमॅन यांनी 2018 मध्ये 98.45 कोटी रुपये पगार घेतला होता.

Image Credited – Yahoo

या यादीत चौथ्या स्थानावर आयबीएमच्या सीईओ व्हर्जिनिया एम रोमेट्टी आहेत. त्यांनी 2018 मध्ये 120.33 कोटी रुपये पगार घेतला होता.

Image Credited – zeebiz

फेबे एन नोव्हाकोव्हिच या यादीत तिसऱ्या स्थानी असून, त्यांनी 2018 मध्ये 141.52 कोटी रुपये पगार घेतला होता.

Image Credited – zeebiz

दुसऱ्या स्थानी लॉकहेड मार्टिनच्या सीईओ मार्लिन ए ह्युसन आहेत. त्यांचा पगार 146.99 कोटी रुपये आहेत.

Image Credited -fortune

सर्वाधिक पगार घेणाऱ्या महिला सीईओंमध्ये पहिल्या क्रमांकावर जनरल मोटर्सच्या सीईओ मॅरी टी बेर्रा या आहेत. त्यांनी 2018 मध्ये 149.73 कोटी रुपये पगार घेतला होता.