या आजीबाईंची फाडफाड इंग्रजी तुम्ही ऐकली का ?

एका वृद्ध महिलेचा अस्खलित इंग्रजी बोलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यात आजाबीई एवढी शानदार इंग्रजी बोलत आहेत की, ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल.

आयपीएस अधिकारी अरूण बोथरा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आजी व्हिडीओमध्ये महात्मा गांधींबद्दल बोलत आहेत. नेटकरी आजींच्या इंग्रजीचे कौतूक करत आहेत. अनेकांना व्हिडीओ पाहून काँग्रेस नेते शशी थरूर यांची देखील आठवण झाली. थरूर हे आपल्या इंग्रजीच्या ज्ञानासाठी ओळखले जातात.

व्हिडीओमध्ये वृद्ध महिला म्हणत आहे की, महात्मा गांधी जगातील महान व्यक्तींपैकी एक होते. ते हिंदू आणि मुस्लिम दोघांवर प्रेम करायचे आणि ते राष्ट्रपिता होते.

https://twitter.com/Truptisarpate/status/1233967730543321089

आतापर्यंत या व्हिडीओला 3 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिले असून, शेकडो युजर्सनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

Leave a Comment