या सरकारी योजनेद्वारे खरेदी करा स्वस्तात सोने

मागील काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. मात्र आता सरकार स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी देत आहे. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेंतर्गत बाजारातील किंमतीपेक्षा कमी किंमतीत स्वस्त सोने खरेदी करू शकता. आयकर नियमांतर्गत देखील यात सूट मिळेल.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 2 मार्च ते 6 मार्च हा कालावधी आहे. सरकारद्वारे गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही 10वी सीरिज आहे.

योजनेंतर्गत तुम्ही 4,260 रुपये प्रती ग्रॅम सोने खरेदी करू शकतात. म्हणजेच तुम्ही 10 ग्रॅम सोने खरेदी केले तर तुम्हाला त्यासाठी 42,600 रुपये मोजावे लागतील. जर गोल्ड बाँड ऑनलाईन खरेदी केल्यास तुम्हाला 50 रुपये प्रती ग्रॅम अतिरिक्त सूट देखील मिळेल.

गोल्ड बाँड तुम्हाला बँक, पोस्ट ऑफिस, एनएसई आणि बीएसई व्यतिरिक्त स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडद्वारे खरेदी करता येईल.

गोल्ड बाँडच्या मॅच्युरिटीचा कालावधी 8 वर्ष असेल व यावर तुम्हाला वर्षाला 2.5 टक्के व्याज मिळेल. बाँडवर मिळणारा व्याज गुंतवणूदाराच्या टॅक्स स्लॅबनुसार कर योग्य असते. मात्र यात टीडीएस कापले जात नाही. जर बाँड 3 वर्षानंतर विकले गेले तर 20 टक्के दराने लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल. मात्र मॅच्युरिटीनंतर विकल्यास व्याज करमुक्त असेल. या योजनेंतर्गत एका आर्थिक वर्षात 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करण्याची परवानगी आहे.

Leave a Comment