या देशात आजही सुरू आहे चक्क 2012 वर्ष

जगभरात सध्या 2020 हे वर्ष सुरू आहे. मात्र एक देश असा देखील आहे, जेथे आजही 2012 हे वर्ष सुरू आहे. एवढेच नाही तर या देशात 12 नाहीतर चक्क 13 महिने असतात.

या देशाचे नाव इथिओपिया आहे. अफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश इथोपिया जगापासून 7 वर्ष 3 महिने मागे आहे. येथे नवीन वर्ष देखील 1 जानेवारी नाहीतर 11 सप्टेंबरला साजरे केले जाते.

Image Credited – Amarujala

जगभरात ग्रेग्रोरियन कॅलेंडरची सुरूवात वर्ष 1582 ला झाली. याआधी ज्यूलियन कॅलेंडरचा वापर होत असे. मात्र ग्रेग्रोरियन कॅलेंडर आल्यानंतर, अनेक कॅथोलिक चर्च मानणाऱ्या देशांनी याला विरोध केला, तर काही देशांनी याचा स्विकार केला. विरोध करणाऱ्या देशांमध्ये इथिओपिया देश देखील होता. याच कारणामुळे येथे आजही 2012 हे वर्ष सुरू आहे.

Image Credited – Amarujala

येथील 13 महिना हा 5 अथवा 6 दिवसांचा असतो. या अंतिम महिन्याला पाग्युमे असे म्हणतात. इथिओपिया हा आफ्रिकेतील एकमेव असा देश आहे, ज्याच्याकडे स्वतःची लिपी आहे. इतर देश आपली भाषा लिहिण्यासाठी रोमन लिपी वापरतात.

Image Credited – Amarujala

येथे केवळ 5 वर्ष दुसऱ्या देशाची सत्ता होती. याच कारणामुळे येथील स्थानिक लोकसंस्कृती अजूनही टिकून आहे. यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सर्वाधिक ठिकाण इथिओपियामधील आहेत. पृथ्वीवरील सर्वात गरम ठिकाण ‘डलोल’ इथिओपियामध्येच आहे. येथे नेहमी 41 डिग्री सेल्सियस तापमान असते.

Leave a Comment