ट्रेलरआधी ‘सूर्यवंशी’चे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला


जसजशी दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख जवळ येत आहे तसतशी या चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच २ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी ‘सूर्यवंशी’च्या रुपात अक्षय कुमारचा दमदार लुक असलेले मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.


‘सूर्यवंशी’च्या या मोशनपोस्टरमधील अक्षयचा लुक आणि संगीत ट्रेलरची उत्कंठा वाढवण्यात यशस्वी ठरला आहे. कारण, हे मोशन पोस्टर अवघ्या काही तासातच सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. हे मोशन पोस्टर ट्विटरवर अक्षय कुमारने शेअर केले आहे. त्याने या व्हिडिओला ‘सूर्यवंशी’च्या ट्रेलरसाठी सज्ज व्हा, असे कॅप्शन दिले आहे. रोहित शेट्टीच्या कॉप ड्रामातील हा चौथा चित्रपट असून अभिनेता जॅकी श्रॉफ यांचीही यामध्ये भूमिका आहे. अक्षय कुमारसोबत कॅटरिना कैफचीदेखील मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट २४ मार्चला रिलीज होणार आहे.

Leave a Comment