‘अंग्रेजी मेडियम’चे नवे गाणे तुमच्या भेटीला


आगामी ‘अंग्रेजी मेडियम’मंधील ‘नाचा नू जी करदा’ गाण्यावर अभिनेत्री राधिका मदन बेफाम थिरकली असून नुकतेच हे गाणे निर्मात्यांनी रिलीज केले. स्कूलमधून गाण्याची सुरूवात होते. राधिकाच्या भोवती मुली अभ्यास करीत आहेत आणि अचानक राधिका डान्स करायला सुरूवात करते.

राधिकाने गाण्यामध्ये बॉलिवूडच्या शाहरुख खान, सलमान खान, ऋतिक रोशन आणि रणवीर सिंह सारख्या कलाकारांच्या सिग्नेचर स्टेप केल्या आहेत. तनिष्क बागचीने ‘नाचा नू जी करदा’ हे गाणे संगीतबध्द केले आहे तर रोमी आणि निकीता गांधी यांनी गाण्याला स्वरसाज चढवला आहे. हे मुळ गाणे ए एस बर्मी आणि के एस बर्मी यांनी रचलेले आहे.

काही दिवसापूर्वी ‘अंग्रेजी मेडियम’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. हा ट्रेलर लोकांच्या पसंतीला उतरला असून चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा सुरू आहे. इरफान खान दोन वर्षानंतर या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर परतणार असल्यामुळे प्रेक्षक आतुर झाले आहेत. १३ मार्चला ‘अंग्रेजी मेडियम’ हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment