माझ्या वजन वाढीला केवळ करण जोहरच जबाबदार


टीव्ही मालिकांपासून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी दूर गेल्या असल्यातरी त्या अधून मधून सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असतात. त्यांनी नुकताच सोशल मीडियावर आपला एक जुना फोटो शेअर करीत करण जोहर आपल्या वाढलेल्या वजनाला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. स्मृती ईराणी यांनी शेअर केलेल्या या फोटोत त्यांच्यासोबत साक्षी तंवर आणि करण जोहर दिसत आहेत.


या फोटोत इराणीसह तिघेही फोटोला स्माईल देताना दिसतात. करण जोहरने देखील या पोस्टवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. फोटोतील ड्रेस पाहून करण चकित झाला. त्याने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले की, ”ओ गॉड, असे पहिल्यांदा घडले असेल की फोटोमध्ये मी स्माईल देत आहे आणि मी हे कोणते कपडे घातले आहेत.

Leave a Comment