टायगरच्या ‘हिरोपंती’च्या सिक्वेलचे पोस्टर रिलीज


आपल्या दमदार अ‍ॅक्शन स्टंटसाठी अभिनेता टायगर श्रॉफ बॉलीवूडमध्ये लोकप्रिय आहे. लवकरच तो त्याच्या ‘बागी ३’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो या चित्रपटानंतर पुन्हा अ‌ॅक्शन अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येईल. लवकरच त्याच्या ‘हिरोपंती’ या चित्रपटाचाही सिक्वेल तयार करण्यात येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटाची निर्मिती साजीद नादियाडवाला हे करणार आहेत. तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान हे करणार आहे.


टायगर श्रॉफने ‘हिरोपंती’ चित्रपटातूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्यासोबत या चित्रपटात क्रिती सेनॉनची भूमिका होती. टायगर या चित्रपटानंतरच अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जाऊ लागला. त्याचे दमदार स्टंट आता ‘हिरोपंती’च्या सिक्वेलमध्येही पाहायला मिळणार असल्याचा अंदाज फर्स्ट लुक पोस्टरवरुन येतो. या चित्रपटात टायगर सोबत कोणती अभिनेत्री भूमिका साकारणार, हे जाहीर करण्यात आले नाही. लवकरच अभिनेत्रीची घोषणा करण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी १६ जुलै २०२१ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment