व्हिडीओच्या नादात बर्फ गोठलेल्या नदीत अडकला टिकटॉक स्टार

शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकवर लोकप्रिय होण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या गोष्टी करतात. अनेकदा यामुळे या टिकटॉक स्टार्सचे प्राण देखील धोक्यात येतात. अशाच एका टिकटॉक स्टारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टिकटॉक स्टार जेसन क्लार्कने व्हिडीओ शेअर करत सांगितले की, तो मृत्यूच्या अगदी जवळ उभा होता, मात्र थोडक्यात त्याचे प्राण वाचवले.

जेनने आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, तो बर्फ जमलेल्या पाण्यात उतरतो व बर्फाच्या चादरी खाली पोहण्यास सुरूवात करतो. मात्र त्याला नंतर बाहेर पडण्यासाठी रस्ताच सापडत नाही. तो हाताने बर्फ फोडण्याचा प्रयत्न देखील करतो. अखेरच्या क्षणी त्याला बाहेर पडणार नाही असे वाटत असतानाच, तो त्यातून बाहेर येतो.

https://www.instagram.com/p/B88-5Qig3E3/?utm_source=ig_web_copy_link

त्याने व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, मी मृत्यूच्या एवढ्या जवळ आजपर्यंत कधीच आलो नव्हतो. पाण्यातून वरील बर्फाबाबत काहीच लक्षात येत नव्हते.

जेसनचा हा व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल होत असून, त्याला आतापर्यंत 21 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यू मिळाले आहेत. तर इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ 1.6 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे.

https://www.instagram.com/tv/B88_IfwgbFt/?utm_source=ig_web_copy_link

पहिला अनुभव भितीदायक आल्यानंतर देखील जेसन पुन्हा एकदा बर्फाच्या नदीत उतरतो. मात्र यावेळी सुरक्षेसाठी त्याने बाहेर पडण्यासाठी बर्फात मोठा खड्डा केलेला आहे.

Leave a Comment