या भूमिकेत मैदानावर उतरला धोनी, पहा व्हिडीओ

आयपीएलच्या यंदाच्या सीझनसोबतच चाहते भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मैदानावर परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. धोनी 3 मार्चपासून चेन्नईमध्ये आपला आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सच्या कॅम्पचा भाग होणार आहे. मात्र त्याआधी धोनी रांची येथील स्टेडियममध्ये प्रॅक्टिससाठी आलेल्या धोनीला खेळपट्टीवर रोलर चालवताना पाहण्यात आले. धोनीचा रोलर चालवताना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

धोनी रांचीमधील झारखंड राज्य क्रिकेट संघाच्या मैदानावर रोलर चालवताना दिसत आहे. धोनी पिच क्यूरेटर झाल्याचे पाहायला मिळत आहे. एमएस धोनी फॅन्स ऑफिशियल नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, एक व्यक्ती, विविध भूमिका, माहीने जेएससीए येथे पिच रोलर मशीनवर हात आजमावला.

Start of organic farming of watermelon in Ranchi followed by papaya in 20 days time.first time so very excited.

Posted by MS Dhoni on Wednesday, February 26, 2020

याआधी धोनीने आपल्या फेसबुक अकाउंटवर शेतीबद्दलची माहिती घेत असल्याचा देखील एक व्हिडीओ शेअर केला होता.

दरम्यान, धोनीने जुलै 2019 पासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये त्याला खेळताना पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Leave a Comment