अनेकदा लोकांना त्यांच्या शरीरावरून, त्यांच्या शारीरिक समस्येवरून चिडवले जाते. लठ्ठपणा हे असेच एक कारण. अनेकदा लठ्ठ व्यक्तींना चिडवले जाते. असेच काहीसे 2020 ची मिस ग्रेट ब्रिटेन ठरलेली जेन एटकिनसोबत घडले होते. मात्र आज जिद्दीच्या जोरावर तिने यशाला गवसणी घातली आहे.
26 वर्षीय जेन एटकिनचे लग्न लठ्ठपणामुळे मोडले होते. मात्र दोन वर्षांच्या मेहनतीनंतर अखेर ती 2020 ची मिस ग्रेट ब्रिटेनची विजेती ठरली आहे. 26 वर्षीय जेनने सांगितले की, लग्न मोडल्यानंतर मला असे वाटले की, माझे आयुष्य येथेच संपले आहे. मी अनेक आठवडे रडत होते व फूडला माझा आधार बनवले.
आपल्या जुन्या आहाराबद्दल जेन सांगते की, मी पास्ता, पिझ्झा आणि चॉकलेट बार खात असे. त्यानंतर दर आठवड्याच्या शेवटी सोफ्यावर बसून खाण्यासाठी 20 डॉलर प्रत्येक वेळी खर्च करायचो.
मात्र लग्न मोडल्यानंतर जेनमध्ये मोठा झाला व तिने आपल्या राहणीमान, आहारात बदल करण्याचा निर्णय घेतला. अखेर दोन वर्षांच्या मेहनतीनंतर जेनने 108 किलोवरून तब्बल 50 किलो वजन केले.
मिस ग्रेट ब्रिटेन खिताब आपल्या नावावर केल्यावर जेन म्हणाली की, मी कधीही इतपर्यंत येईल याचा विचार केला नव्हता. मला अजुनही आश्चर्याचा धक्का बसला आहे. मला एवढा आनंद झाला आहे की शब्दात सांगू शकत नाही. मला खरच यावर विश्वास बसत नाहीये.
आपल्या मोडलेल्या लग्नाबद्दल ती म्हणाली की, मी संपुर्णपणे उद्घवस्त झाले होते. मात्र अखेर माझ्यासोबत घडलेली ती सर्वोत्तम गोष्ट आहे.