फर्स्ट लेडी मेलेनियाचा मेकअपवर रोज ३ लाखाचा खर्च


फोटो सौजन्य मेट्रो
अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प पत्नी मेलेनिया आणि परिवारासह भारत दौरा करून अमेरिकेला परतले आहेत. फर्स्टलेडी मेलेनिया यांनी त्यांच्या पहिल्या भारत भेटीविषयी येथे येण्यापूर्वी सोशल मिडियावर या भेटीविषयी खूप उत्सुकता प्रकट केली होती तसेच भारतवासियांना सुद्धा मेलेनिया यांना पाहण्याची उत्सुकता होती. मेलेनिया यांची राहणी छानछोकीची आहे. कारण त्या सुपरमॉडेल म्हणून पूर्वी काम करत होत्या. अर्थात २०१६ मध्ये जेव्हा ट्रम्प राष्ट्रपती बनले त्यानंतरच मेलेनिया यांना फर्स्ट लेडी म्हणून अधिक प्रसिद्धी मिळाली.

मेलेनिया यांची ओळख स्टायलिश फर्स्टलेडी अशीच आहे. त्यांचे आउटफिट, डाएट, मेकअप, दागिने यांची नेहमीच चर्चा होते. मेलेनिया यांच्या मेकअप वर दररोज ३ लाख रुपये खर्च केला जातो आणि त्यांची मेकअप आर्टिस्ट व्हाईटहाउस मध्ये कायम उपस्थित असते असे सांगितले जाते. मेलेनिया एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा वापरत नाहीत. त्यांचे ड्रेससुद्धा लाखो रुपये किमतीचे असतात.

एका रिपोर्टनुसार मेलेनिया दिवसातून सात वेळा आहार घेतात आणि त्यात वेगवेगळी फळे असतात. नाश्त्याला ओट्स तर कधी स्मूदी त्या घेतात आणि दिवसात अडीच लिटर पाणी पितात. ए, सी आणि ई व्हीटॅमीनच्या गोळ्या त्या घेतात. चॉकलेट आणि आईस्क्रीम हे त्यांचे आवडते पदार्थ आहेत. मेलेनिया आणि ट्रम्प यांच्या वयात २४ वर्षाचे अंतर असून त्या ट्रम्प यांची तिसरी पत्नी आहेत. त्यांनी लग्नात घातलेल्या ड्रेसची किंमत दोन लाख डॉलर्स होती असेही सांगतात. २००० साली त्यांनी जेन्ट्स मासिकासाठी न्यूड फोटो शूट केले होते आणि अध्यक्षीय निवडणूक काळात हे फोटो जबरदस्त व्हायरल झाले होते.

Leave a Comment