टोक्यो ऑलिम्पिकवर करोनाचे सावट, स्पर्धा रद्द होण्याची शक्यता


करोना विषाणूचा धोका अजून ओसरलेला नसतानाच यंदाच्या वर्षात जपान मध्ये होत असलेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेबाबत मोठी बातमी आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्याचा हवाल्याने दिलेल्या या बातमीनुसार मे महिन्याअखेर कोरोनावर नियंत्रण आले नाही तर या स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अश्या परिस्थितीत तारखेत बदल अथवा अन्य देशात या स्पर्धा भरविल्या जाणार नाहीत.

टोक्यो ऑलिम्पिकची सुरवात २४ जुलै पासून होत असून या स्पर्धा ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. कोरोनामुळे चीनचे मुष्टियोद्धा आणि बॅडमिंटन ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा पूर्वीच रद्द केल्या गेल्या आहेत. ऑलिम्पिक स्पर्धा आयोजन समितीने करोना विषाणूमुळे या स्पर्धेवर संभावित प्रभाव पडण्याचा धोका मान्य केला आहे. टोक्यो ऑलिम्पिक २०२० साठीचे सीइए तोशिरो मुटो यांनी कोरोना विषाणू निपटारासाठी काय उपाय योजले जात आहेत यावर समिती लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले आहे.

चीन मध्ये करोनाचा प्रकोप सर्वाधिक असला तरी जपान मधेही या विषाणूची लागण झालेले लोक आढळले आहेत. तसेच या स्पर्धेसाठी जगभरातून खेळाडू येणार आहेत त्या अनेक देशात करोना विषाणू संक्रमण झाले आहे हे लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

Leave a Comment