पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली लेदर निवडुंगापासून तयार


फोटो सौजन्य नवभारत टाईम्स
जगभरात आज लेदर उद्योगचा विस्तार मोठा असून लेदरचा बाजारही प्रचंड मोठा आहे. आजकाल लेदरपासून कपडे, बॅग्ज, शूज, कारसीट, विविध प्रकारचे बेल्ट अश्या अनेक वस्तू बनविल्या जातात आणि त्यांना चांगली मागणी आहे. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्राणी संहार केला जातो. हे शिकार प्रमाण इतके मोठे आहे की त्यामुळे प्राण्यांच्या अनेक जाती विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. शिवाय लेदर उद्योगामुळे होणारे प्रदूषण भयानक आहे. यावर दोन तरुण मुलांनी उपाय शोधला असून त्यांनी निवडुंगापासून अस्सल लेदरच्या तोडीचे लेदर तयार केले आहे.

अँड्रेन लोपेझ व्हेलार्डी आणि मार्त कॅसेरेज यांनी निवडुंगापासून तयार केलेले हे लेदर अतिशय उत्तम दर्जाचे असून वेगन लोक सुद्धा ते वापरू शकणार आहेत. या प्रकारे वनस्पतीपासून प्रथमच लेदर तयार केले गेले असल्याचा त्यांचा दावा आहे. प्राणी आणि कृत्रिम लेदरला हा चांगला पर्याय आहे शिवाय हे लेदर ब्रीदेबल आणि दीर्घ काळ टिकाऊ आहे. त्याचा फील खऱ्या लेदर सारखा आहे शिवाय ते अनेक रंगात उपलब्ध आहे. हे लेदर विषारी रसायने आणि पीयुसी पासून मुक्त आहे.

या लेदर पासून निसर्गाला काहीही धोका नाही. हे लेदर वनस्पती पासून बनले असल्याने ते बायोडीग्रेडेबल, ऑर्गनिक आणि इकोफ्रेंडली आहे. कारसीट, बॅग्ज, शूज अश्या विविध वस्तू त्यापासून तयार करता येतात. त्यांची किंमत साधारण खऱ्या लेदरइतकीच आहे.

Leave a Comment