चार पुरस्कारांसह सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर ‘पॅरासाईट’ने पटकावला


यंदाच्या ९२व्या ऑस्कर पुरस्कारांचे ‘जोकर’, ‘पॅरासाईट’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड’, ‘लिटील वूमन’, ‘१९१७’ अशा चित्रपटांना नामांकन मिळाले होते. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातून कलाकारांची मेहनत, अभिनय कलेने गाठलेली एक वेगळी उंची आणि तंत्रज्ञानाचा वापर करत अधिक बहरलेली ही चित्रपट साकारण्याची कला नेमकी किती उंची गाठू शकते याची अनुभूती आली. कलेचा आणि कलाकारांचा गौरव अमेरिकेतील डॉल्बी थिएटर येथे पार पडलेल्या डोळे दीपवणाऱ्या या सोहळ्यात करण्यात आला.

अनेक सेलिब्रिटी आणि द अकॅडमीच्या सदस्यांसमक्ष रंगभूषा, ध्वनी संकलनापासून छायांकन आणि दिग्दर्शनासाठीचे ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘१९१७’ आणि ‘पॅरासाईट’ या चित्रपटाने यामध्ये दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. यंदाचा ऑस्कर खऱ्या अर्थाने दक्षिण कोरियाच्या ‘पॅरासाईट’ या चित्रपटाने गाजवला. या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनाचीह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरव करण्यात आला. यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला कोणता पुरस्कार मिळाला याची यादी खालील प्रमाणे…

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅरासाईट
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रेनी झेल्वेगरला (Judy)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता- जोकिन फिनिक्स (जोकर)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बाँग जून हो यांना (पॅरासाईट)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – जोकर
  • सर्वोत्कृष्ट मूळ गीत – ‘आय एम गॉन अ लव्ह मी अगेन’ (रॉकेटमॅन)
  • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट- दक्षिण कोरिया (पॅरासाईट)
  • सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा – बॉम्बशेल
  • सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – फोर्ड व्हर्सेस फेरारी
  • सर्वोत्कृष्ट छायांकन – रॉजर डेकिन्स (१९१७)
  • सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण – १९१७
  • सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – फोर्ड व्हर्सेस फेरारी
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लॉरा डेर्न (मॅरेज स्टोरी)
  • सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट फिचर)- लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉरझोन (इफ यु आर अ गर्ल)
  • सर्वोत्कृष्ट माहितीपट – अमेरिकन फॅक्टरी
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा – जॅकलिन दुरान (लिटील वूमन)
  • सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन – वन्स अपॉन अ टाईन इन हॉलिवूड
  • सर्वोत्कृष्ट ‘लाईव्ह ऍक्शन’ लघुपट – द नेबर्स विंडो
  • सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड) – ताइका वाईतीती (जोजो रॅबिट)
  • सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – बाँग जून हो (पॅरासाईट)
  • सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुपट – हेअर लव्ह
  • सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड चित्रपट – टॉय स्टोरी ४
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ब्रॅड पीट (वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड)

Leave a Comment