तुम्ही पाहिली आहे का स्टॅच्यू ऑफ यूनिटीची सर्वात छोटी थ्रीडी प्रतिकृती

गुजरातमधील सुरत येथील 8 मित्रांनी स्टॅच्यू ऑफ यूनिटीची सर्वात छोटी थ्रीडी प्रिंटेड प्रतिकृती तयार केली आहे. ही प्रतिकृती 13 मिमी उंच आणि 0.8 ग्रॅम वजनाची आहे.  म्हणजेच या प्रतिकृतीचे वजन 1 ग्रॅमपेक्षाही कमी आहे.

ही थ्रीडी प्रतिकृती एसटीपीएल थ्रीडी कंपनीने तयार केली आहे. ही सुरत येथील एक कंपनी असून,  ही कंपनी आर्ट, इंजिनिअरिंग, मेडिकल, डिझाईन आणि मार्केटिंग मैन्यफॅक्चरचे काम  करते.

वडोदरा येथील सरदार सरोवर डॅमजवळील 182 मीटर उंचीच्या स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या तुलनेत ही प्रतिकृती केवळ 13 मिमी आहे. ही प्रतिकृती अवघ्या 30 ते 35 मिनिटात बनविण्यात आली आहे. 3डी ग्लासद्वारे ही प्रतिकृती स्पष्ट दिसते.

Leave a Comment