रॅगिंग रोखण्यासाठी 9 वर्षीय विद्यार्थीनीने तयार केले ‘अँटी बुलिंग’ अ‍ॅप

शाळेत चिढवत असल्याने व धमकीने वैतागून मेघालयातील 9 वर्षीय विद्यार्थीनीने ‘अँटी बुलिंग’ मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने पीडित व्यक्तीचे ओळख न सांगता अशा घटनांची माहिती थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहचेल. शिलांगच्या चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मैदाईबाहुन मॉजाने हे अ‍ॅप बनविले आहे. विद्यार्थीनीचे कौतूक राज्य सरकारने देखील केले आहे.

मैदाईबाहून मॉजा म्हणाली की, जेव्हा ती नर्सरीमध्ये होती, तेव्हापासूनच तिला धमक्या मिळत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून अ‍ॅप बनविण्याचा निर्णय घेतला. आणखी कोणाला या सारख्या समस्येचा सामना करावा लागू नये, असे मला वाटते.

मॉजाने सांगितले की, या अ‍ॅपचा वापर करणाऱ्या युजर्सला धमकी देणाऱ्या व्यक्तीसह घटनेची संपुर्ण माहिती द्यावी लागेल. याद्वारे अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती मिळेल व पुढील कारवाई होईल.

मॉजाच्या आईने सांगितले की, मागील वर्षी सप्टेंबरमध्ये तिने अ‍ॅप-डेव्हलपमेंटचा कोर्स केला होता. यानंतर ती काही महिन्यातच अ‍ॅप बनवायला शिकली.

Leave a Comment