शरद पवारांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पत्रकाराविरुद्ध तक्रार दाखल


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शरद पवारांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पत्रकार भाऊ तोरसेकर आणि ‘पोस्टमन’ या पोर्टलवर कमेंट करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

समाज माध्यमांवर गेले अनेक महिने टोकाच्या विद्वेशाची भावना पसरवणे, तसेच जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय एैक्याला तडा जातील, अशा अनेक पोस्टर सोशल मीडियावर पाहत आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे राजकारण थांबल्यानंतर हा प्रकार कमी होईल, असे वाटत होते. त्यामुळे याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. पण महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पत्रकार भाऊ तोरसेकर, घनश्याम पाटील आणि इतर लोक सातत्याने यूट्यूब, पोस्टमन पोर्टल, टीक-टॉकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमधील भाषणे पाहिली तर तरुणांमध्ये व समाजात शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे अशी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे निदर्शनास आल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Comment