ऑटो एक्सपोमध्ये सादर झाली ‘धन्नो’ कमर्शियल ई-बाइक


अनेक इलेक्ट्रिक वाहने ग्रेटर नोएडामध्ये सुरू असलेल्या ऑटो एक्सपो 2020 मध्ये सादर करण्यात आली आहेत. यात कार, बस, बाइक अशा विविध पर्यायात इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध आहेत. या सर्व कंपनीत एक नाव हरियाणातील बिलासपूरची कंपनी इवोलेटचे आहे. ‘धन्नो’ नावाने कमर्शियल ई-बाइक इवोलेटने सादर केली आहे. एक्सपोमध्ये या बाइकने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे आकर्षित केले आहे.

याबाबत माहिती देताना इवोलेटच्या एमडी आणि सीईओ प्रेरणा चतुर्वेदी यांनी सांगितले की, दर वर्षी 1 लाख ई-स्कूटर विकण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्याचबरोबर पॅसेंजर आणि कार्गो ट्रांसपोर्टेशनमध्ये ई थ्री व्हीलर्सच्या माध्यमातून कमर्शियल वेहीकल सेगमेंटमध्ये आम्ही येत आहोत. आम्ही या योजनेतून पुढील वर्षीपर्यंत 1 हजार कोटींच्या टर्नओव्हरची आशा करत आहोत.

लोकप्रिय चित्रपट ‘शोले’मध्ये हेमामालिनी यांनी साकारलेल्या बंसती टांगेवालीच्या घोडीचे नाव धन्नो होते. अनेक प्रवासी आणि वजन उचलून धन्नो पळू शकत होती. यामुळेच त्या घोडीच्या नावावरुन आम्ही या गाडीचे धन्नो नाव ठेवले. या बाईकचे वैशिष्ट्य असे आहे की, या गाडीवर खूप सारे वजन तुम्ही घेऊन जाऊ शकता.

कंपनीने धन्नोच्या बॅक सीटला अशाप्रकारे डिझाइन केले आहे की, याला ओपन केल्यावर एक मोठा ट्रे बनतो. या ट्रेवर भरपूर सामान ठेवू शकतात. तसेच, मोठा लेग रुम फ्रंटवर दिला आहे. गाडीच्या समोर एक मोठे बास्केट आहे, यातही तुम्ही सामान ठेवू शकता. एकूण धन्नो जवळपास 100 किलो सामान उचलू शकते.

72 वोल्टची बॅटरी धन्नोमध्ये देण्यात आली आहे, जी 3 ते 4 तासात फूल चार्ज होते. गाडी सिंगल चार्जमध्ये 80 किलोमीटर चालू शकते. धन्नोची टॉप स्पीड 45 किमी प्रती तास आहे. एखाद्या क्रूजर बाइकसारखा याचा लूक आहे. या ई-बाइकला पूर्णपणे कमर्शियल वापरासाठी बनवले आहे. यामुळेच या बाईकच्या बॅक साइडला 3 सस्पेंशन आहेत. ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा एखाद्या बाईकमध्ये तीन सस्पेशंन असतील. याशिवाय, यात मागे आणि पुढे एलइडी लाइट आहेत.

Leave a Comment