मर्सिडिज बेंझची सर्वात वेगवान कार भारतात लाँच

जर्मनीची लग्झरी कार कंपनी मर्सिडिज बेंझने ऑटो एक्स्पो 2020 मध्ये आपली सर्वात वेगवान कार मर्सिडिज बेंझ एएमजी जीटी 63ए 4 डोर कूपे (Mercedes Benz AMG GT 63S 4 DOOR COUPE) लाँच केली आहे. ही जगातील सर्वात वेगवान कार सीरिज प्रोडक्शन 4 सीटर कार आहे.

Image Credited – Jagran

या कारचा टॉप स्पीड ताशी 315 किमी असून, ही कार केवळ 3.2 सेंकदात ताशी 0 ते 100 किमी अंतर पार करू शकते. ही मर्सिडिजची आतापर्यंतची सर्वात वेगवान कार असल्याचे सांगितले जात आहे. नवीन मर्सिडिज एएमजी जीटी 63एसची टक्कर पोर्शे Panamera Turbo शी होईल.

Image Credited – Team-BHP

या वेगवान कारमध्ये 4.0 लीटर ट्विन टर्बो व्ही8 इंजिन देण्यात आलेले आहे. जे 639 एचपी पॉवर आणि 900एनएम टॉर्क निर्माण करते. यात 9 स्पीड ऑटोमेटिक गिअरबॉक्स आणि सोबतच ऑल व्हिल ड्राईव्ह सिस्टम देण्यात आली आहे.

Image Credited – Topgear

इंटेरिअरबद्दल सांगायचा तर यात 12.3 इंच टचस्क्रीन डिस्प्ले मिळेल. ज्यात इंस्ट्रूमेंशन आणि इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल. स्टेअरिंग व्हिल, सेंट्रल कंसोल आणि टचपॅडमध्ये नवीन डिझाईन मिळेल.

Leave a Comment