टायगर श्रॉफच्या बागी 3 चा ट्रेलर रिलीज


अभिनेता टायगर श्रॉफच्या बागी सिरीजचा आगामी तिसरा चित्रपट ललवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ज्यात पुन्हा एका जबरदस्त अ‍ॅक्शन अवतारात टायगर श्रॉफ दिसत आहे.

टायगर श्रॉफसोबत ‘बागी 3’मध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर पुन्हा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. श्रद्धा आणि टायगर याआधी बागी सिरीजच्या पहिल्या भागात एकत्र दिसले होते. बागी सिरीजच्या तिसऱ्या भागात त्यांच्या बरोबरच रितेश देशमुख टायगरचा भाऊ विक्रम आणि पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. विक्रम त्याच्या कामासाठी सीरियामध्ये जातो आणि अचानक एक दिवस त्याचे अपहरण होते. टायगर आपल्या भावाला वाचवण्यासाठी सीरियात जातो आणि तिथे त्याचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळातो.

मागच्या काही दिवसांपासून या चित्रपटासाठी टायगर जोरदार तयारी करत होता. ‘बागी 3’चं दिग्दर्शन अहमद खानने केले आहे. तर निर्मिती साजिद नाडियालवालाची आहे. या चित्रपटात आशुतोष राणा, चंकी पांडे आणि अंकिता लोखंडे यांच्याही भूमिका असल्याचे बोलले जात आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणे या तिसऱ्या भागातही जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स असणार आहेत.

Leave a Comment