चक्क बिअर कॅनच्या मदतीने सापडले 3 वर्षांपुर्वी हरवलेले कुत्रे

अनेकदा आपण एखाद्या व्हारल व्हिडीओमुळे अनेक वर्षांपुर्वी हरवलेली व्यक्ती सापडल्याचे ऐकत असतो. अशाच प्रकारे एका बिअर कॅनमुळे 3 वर्षांपुर्वी हरवलेले कुत्रे सापडल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेतील फ्लोरिडा येथील एका कंपनीने बिअर कॅन्सवर शेल्टर कुत्र्यांचे फोटो लावण्यास सुरुवात केली आहे. या कॅन्सवरील फोटो पाहून महिलेला आपला हरवलेला कुत्रा सापडला.

अमेरिकेतील मिनेसोटो येथे राहणाऱ्या मोनिका मँथिस या महिलेचे कुत्रे 3 वर्षांपुर्वी 2017 मध्ये घर सोडून गेले होते. एकेदिवशी फेसबुकवर स्क्रोल करत असताना त्यांना फ्लोरिडातील एका कंपनीची पोस्ट दिसली. या पोस्टमध्ये महिलेने बिअर कॅन्सवर कुत्र्याचा फोटो पाहिला.

Special Adoptable Dog Beer Release Benefit at this Sunday’s Yappy Hour 1-4PM!• Partnering with this month's cause,…

Posted by Motorworks Brewing on Friday, January 17, 2020

मोनिकाने सांगितले की, बिअर कॅन्सरवर फोटो बघितल्यावर माझ्या लक्षात आले की हे तर माझेच कुत्रे आहे. 7 वर्षांचे हे कुत्रे त्या चार कुत्र्यांपैकी एक आहे ज्यांचे फोटो कॅन्सवर छापण्यात आले आहेत.

आपले कुत्रे ओळखल्यानंतर मोनिकाने एनिमल शेल्टरशी संपर्क साधला. त्यानंतर शेल्टरने कुत्र्याची ओळख पटवण्यासाठी त्याचे फोटो आणि अन्य माहिती मागवली. त्यानंतर शेल्टरने देखील हे तेच हरवलेले कुत्रे असल्याचे स्पष्ट केले. मोनिकाने आपल्या या कुत्र्याच्या अनेक गोष्टी सांभाळून ठेवल्या होत्या.

मोटारवर्क्स कंपनी बिअर कॅन्सवरील कुत्र्यांच्या फोटोंद्वारे भटक्या कुत्र्यांवर चांगले घर मिळवून देण्यास मदत करत आहे. यासाठी कंपनी कॅम्पेनद्वारे मोठ्या प्रमाणात फंड जमवत आहे.

Leave a Comment