Under 19 World Cup ; ४ फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना


बेनोनी – पाकिस्तानने आयसीसी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अफगाणिस्तानला सहा विकेट्स राखून पराभूत केले. आता त्यांचा उपांत्य फेरीत भारताशी सामना होणार असल्यामुळे सर्वांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. हा सामना ४ फेब्रुवारीला होणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा अफगाणिस्तानचा संघ १९८ धावांवर ढेपाळला. हे आव्हान पाकिस्तानने सहा गडी राखून सहज पूर्ण केले. पाकिस्तानकडून सलामीवीर मोहम्मद हुरैराने ७६ चेंडूत ६४ तर, हैदल अलीने ६१ धावा केल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा अफगाणिस्तानने निर्णय घेतला. कर्णधार फरहान जाखीलने सर्वाधिक ४० धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिर खानला तीन बळी मिळाले. फहादने दोन तर, ताहिर हुसेन, अब्बास आफ्रिदी, आमिर अली, अक्रम यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

भारताने आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा ७४ धावांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली. भारताने दिलेले २३४ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवले नाही. कार्तिक त्यागी आणि आकाश सिंग यांच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ सर्वबाद १५९ धावा करू शकला.

Leave a Comment