बुमराहवर टीका करुन तोंडघशी पडले संजय मांजरेकर


नवी दिल्ली – पुन्हा एकदा सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर ट्रोल झाले आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ट्विटरवरून मांजरेकरांनी एक सल्ला दिला. त्यांना नेटिझन्सनी या ट्विटमुळे ट्रोल केले आहे.


न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. जसप्रीत बुमराहने या षटकात भारताकडून १७ धावा दिल्या होत्या. मांजरेकरांनी या धावांमुळे बुमराहबद्दल ट्विट केले. बुमराहने टाकलेली सुपर ओव्हर पाहिली. तो एक उत्तम गोलंदाज आहे, परंतु वेगळ्या कोनातून तयार करण्यासाठी तो क्रीझचा अधिक उपयोग करू शकतो, असा सल्ला मांजरेकरांनी दिला. यावरुन नेटकऱ्यांनी संजय मांजरेकरांची चांगलीच शाळा घेतील.

Leave a Comment