‘बीसीसीआय’च्या सल्लागार समितीत आरपी सिंह, मदनलाल आणि सुलक्षणा नायक


नवी दिल्ली – शुक्रवारी आपली नवीन क्रिकेट सल्लागार समिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केली. मदनलाल, रुद्र प्रताप सिंग आणि सुलक्षणा नायक यांचा तीन सदस्यांच्या समितीत समावेश आहे. या सीएसीची मुदत बीसीसीआयच्या निवेदनानुसार एक वर्षाची असेल. हे नव्या सीएसीचे नवीन मुख्य निवडक एमएसके प्रसाद आणि निवड समिती सदस्य गगन खोडा यांच्या जागी नवीन नेमणुका करणे पहिले काम असेल.

क्रिकेट सल्लागार समितीकडेच देशाच्या विविध संघांचे प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारीसुद्धा असते. गतवर्षी कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांनी हितसंबंधांचे आरोप झाल्यामुळे क्रिकेट सल्लागार समितीचा राजीनामा दिला होता.

सुलक्षणा नायक यांनी भारतीय महिला संघाचे ११ वर्षे प्रतिनिधित्व केले असून त्यांना २ कसोटी, ४६ एकदिवसीय आणि ३१ टी-२० सामन्यांचा अनुभव आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू मदनलाल यांना ३९ कसोटी आणि ६७ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असून ते १९८३च्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे सदस्य होते. भारताचे माजी प्रशिक्षक तसेच वरिष्ठ गटाच्या निवड समितीचे माजी सदस्य. रूद्र प्रताप सिंग म्हणजेच आर.पी.सिंगला १४ कसोटी, ५८ एकदिवसीय आणि १० टी-२० सामन्यांचा अनुभव. २००७च्या टी-२० विश्वविजेत्या संघाचा सदस्य होता.

Leave a Comment