चला पाहूया बिल गेट्स यांचा आशियाना


जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत माईक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर कंपनीचे मालक बिल गेट्स हे पहिल्या क्रमांकावर असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. पण फार कमी लोकांना त्यांच्या घराबद्दल माहिती असेल. वॉशिंग्टनमध्ये बिल गेट्स हे राहतात. डोंगर आणि नदीच्या मधोमध त्यांचे घर आहे. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कसा आहे त्यांचा आशियाना…

अतिशय सुंदर अशा लोकेशनवर बिल गेट्स यांचे शानदार घर आहे. वॉशिंग्टनच्या नदी किनारी बिल गेट्स यांचे घर असून आजूबाजूला मोठे डॊंगर आहेत.

तब्बल ६६ हजार स्क्वेअर फूटाच्या परिसरात गेट्स यांचे घर पसरले असून तब्बल ७ वर्षाचा कालावधी हे घर तयार करण्यासाठी लागला होता. १३ मिलियन डॉलर ऐवढी या घराची किंमत आहे. या घरात एक मोठा जिम असून २५०० स्क्वेअर फूटाच्या परिसरात जिम आहे. या बंगल्यात ७ बेडरूम, २४ बाथरूम, १ किचन, १ स्विमिंग पूल, २३०० स्क्वेअर फूटाचा डायनिंग हॉल आहे. त्याचबरोबर या बंगल्यात १५०० स्क्वेअर फूटाचे एक थिएटरही आहे. ज्यात साधारण २० लोक एकत्र बसू शकतात. यासोबत एक भली मोठी लायब्ररी सुद्धा या घरात आहे. तब्बल ३० मिलियन डॉलर एवढा ती बनवण्यासाठी खर्च लागला.

Leave a Comment