फर्स्ट लुकनतंर रिलीज झाला झुंडचा टिझर


आपल्या तब्बल पाच चित्रपटांच्या चित्रीकरणात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या व्यस्त आहेत. यावर्षी त्यांचे तब्बल 5 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे बिग बी यंदाचे वर्ष गाजवणार एवढे मात्र निश्चित आहे. त्यातच आता त्यांच्या बहुचर्चित ‘झुंड’ या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला. सोशल मीडियावर सध्या या टीझरची जोरदार चर्चा सुरू आहे.

प्रसिद्ध मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला झुंड हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अमिताभ बच्चन या चित्रपटात फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही मुलांचा घोळका या चित्रपटाच्या टीझरमध्ये हातात बॅट, चैन आणि हॉकी स्टीक इत्यादी घेऊन चालताना दिसत आहे. तर बॅकग्राउंड म्युझिकसोबत ‘झुंड नाही सर टीम कहीए टीम’ असा अमिताभ यांचा दमदार डायलॉग ऐकू येतो.

महाष्ट्रातील नागपूर शहरात झुंड चित्रपटाचे बहुतांश शूटिंग हे झाले आहे. साधेपणा हे नागराज मंजुळेंच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य त्यांनी या चित्रपटातही जपले आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सेटवरील काही फोटो सुद्धा व्हायरल झाले होते. अमिताभ बच्चन ज्यात अत्यंत साध्या वेशात दिसले होते. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन पहिल्यांच एकत्र काम करत असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काय कमाल करतो याची सर्वांना उत्सुकता आहे.

Leave a Comment