हा विक्रम करणारे व्हॉट्सअ‍ॅप ठरले दुसरे गैर गुगल अ‍ॅप

इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोड होण्याच्या बाबतीत अनेक अ‍ॅप्सना मागे टाकत मोठी कामगिरी केली आहे. फेसबुकच्या मालकीच्या या अ‍ॅपने 5 अब्जवेळा डाउनलोड होण्याचा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारे हे दुसरे गैर-गुगल अ‍ॅप आहे. या आकड्यांमध्ये केवळ प्लेस्टोरवरून डाउनलोड केलेल्या अ‍ॅपचाच नाही तर सॅमसंग आणि ह्युवाई सारख्या स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच इंस्टॉल असलेल्या अ‍ॅपच्या संख्येचा देखील समावेश आहे.

व्हॉट्सअ‍ॅप जगातील सर्वात लोकप्रिय मोबाईल मेसेंजर अ‍ॅप आहे. महिन्याला या अ‍ॅपचे 1.6 अब्ज सक्रिय युजर्स आहेत. त्यानंतर यादीत 2019 मध्ये फेसबुक मेसेंजरची संख्या  1.3 अब्ज युजर्स आणि 1.1 अब्ज युजर्ससोबत व्हीचॅट तिसऱ्या स्थानावर आहे.

फेसबुक व युट्यूबनंतर व्हॉट्सअ‍ॅप तिसरे सर्वाधिक लोकप्रिय अ‍ॅप आहे. गुगल प्ले स्टोरनुसार, दक्षिण कोरिया व्हॉट्सअ‍ॅपचे सर्वात वेगाने वाढणारे मार्केट आहे. 2019 मध्ये व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोडिंगचे प्रमाण 56 टक्क्यांनी वाढले आहे.

जगभरात सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेल्या टॉप-5 अ‍ॅपमध्ये इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, फेसबुक मेसेंजर हे 4 फेसबुकच्याच मालकीचे आहेत.

Leave a Comment