जाणता राजा वाद, शरद पवारांचे उदयनराजेंना उत्तर


सातारा : जाणता राजा या उपाधीवरुन माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी साधलेल्या निशाण्यानंतर त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. शरद पवारांच्या हस्ते खटाव- माण साखर कारखान्याच्या 251001 व्या साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. पवारांनी यावेळी जाणता राजा यावरुन उदयनराजेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.

शरद पवार म्हणाले, मी केव्हाही म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा. रामदास स्वामींनी जाणता राजा हा शब्द आणला. रामदास शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते. तर जिजाऊ या गुरु होत्या. रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु होते ही लेखणीची कमाल आहे. शिवाजी महाराजांची खरी छत्रपती ही उपाधी आहे.

त्याचबरोबर मी येथे कार्यक्रमाला आल्यापासून माझ्या प्रतिक्रियेसाठी सगळे पत्रकार मागे लागले आहेत. पण तरी मी कोणाला बोललो नाही. उदनयराजेंवर रामराजे निंबाळकर बोलायला पुरेसे आहेत. मी केव्हाही म्हटले नाही की मला जाणता राजा म्हणा. आपण जर शिवचरित्राचा व्यवस्थित अभ्यास केला तर जाणता राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना कधीच लावण्यात आली नव्हती. रामदास स्वामी शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते. तर जिजाऊ या गुरू होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते ही लेखणीची कमाल असून छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी असल्याचे म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंना उत्तर दिले आहे.

Leave a Comment