निर्भया दोषींनी तिहार जेलमध्ये कमावले लाखो रुपये


नवी दिल्ली : 22 जानेवारी रोजी सकाळी दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोषींची क्युरेटिव्ह म्हणजेच फेरविचार याचिका फेटाळल्यामुळे निर्भया प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा अटळ आहे. अक्षय ठाकूर सिंह, मुकेश, पवन गुप्ता आणि विनय कुमार यांना या प्रकरणी 22 जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. एका दोषीला फाशी देण्याचे पवन या जल्लादला 15 हजार रुपये मिळणार आहेत. त्यानुसार चारही दोषींना फाशी देण्यासाठी जल्लादला तब्बल 60 हजार रुपये मिळणार आहेत. हे चौघे गेल्या सात वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

प्रत्येक कैद्याला तुरुंगात असताना तेथील नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. शिवाय तुरुंगात मजुरी केल्यानंतर त्याचे मानधनही मिळते. गेल्या सात या चौघांनी वर्षांत लाखो रुपयांची कमाई केली आहे. गेल्या सात वर्षांत या चौघांनी तब्बल 1 लाख 37 हजार रुपये कमावले आहेत. अक्षयने तुरुंगात मजुरी केल्याबद्दल 69,000 रु., विनयने 39,000 रु. आणि पवनने 29,000 रुपये कमावले आहे. या दरम्यान चौथा दोषी मुकेशने काहीच काम केले नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मिळालेल्या निधीचे काय करायचे याबाबत दोषींनी अद्याप काहीही ठरविलेले नाही. पण त्यांनी मृत्यूपूर्वी याबाबत निर्णय न दिल्यास हा निधी त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात येण्याची शक्यता आहे.

दोषी विनयच्या वडिलांनी तिहार तुरुंगात त्याची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दोषींच्या तुलनेत विनय अधिक तणावात दिसून येत आहे. तो अत्यंत अस्वस्थ आहे. त्याचे तिहार तुरुंगातील अनेक नियमभंगामध्ये नाव आहे. यासाठी त्याला सर्वाधिक शिक्षाही मिळाली आहे. तुरुंगात असताना तेथील नियम पाळणे अनिवार्य असते. अन्यथा तुरुंग प्रशासनाकडून शिक्षा दिली जाते. विनयला यामध्ये नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 11 वेळा, मुकेशला 3, पवनला 8 तर अक्षयला एक वेळा शिक्षा देण्यात आली आहे.

Leave a Comment