स्ट्रीट डान्सरमधील ‘लग दी लाहोर दी’ गाणे रिलीज


लवकरच आपल्या भेटीला दिग्दर्शक रेमो डिसूजाचा ‘स्ट्रीट डान्सर’ हा चित्रपट येणार आहे. रिलीज होण्यापूर्वीच हा चित्रपट बराच चर्चेत आहे. आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून पाशिमात्य नृत्यप्रकार अनेक नृत्यप्रकार करणारे रेमो डिसूजा यांच्या या नवीन चित्रपटात असेच काही नृत्यप्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील ‘गरमी’ गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज केल्या नंतर या चित्रपटातील अन्य गाण्यांविषयीही अनेकांची उत्सुकता वाढली होती. आता नुकतेच या चित्रपटातील नवीन गाणे ‘लग दी लाहोर दी’ रिलीज करण्यात आले आहे. वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि नोरा फतेहीची जबरदस्त केमिस्ट्री या गाण्यातपाहायला मिळणार आहे.

गुरु रंधावा आणि तुलसी कुमार यांनी हे गाणे गायिले असून गुरु रंधावा यांनीच या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार आहेत. वरुण धवन हा चित्रपटात भारतीय डान्सर बनला असून श्रद्धा कपूर पाकिस्तानी डान्सर बनली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरुन या दोघांतही छोटी-मोठी भांडणे, रुसवे-फुगवे पाहायला मिळणार आहे. डान्सर प्रभू देवा देखील या चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिव्या खोसला कुमारा, कृष्ण कुमार आणि लिजेल डिसूजा यांनी केली आहे. तर या चित्रपटात वरुण, श्रद्धा व्यतिरिक्त धर्मेश सर, राघव, सलमान यांसारखे अनेक दमदार कलाकार तसेच इतर डान्सर्स दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या 24 जानेवारी रिलीज होणार आहे.

Leave a Comment