शरद पवार आमच्यासाठी काल, आज आणि उद्याही ‘जाणता राजा’


मुंबई – राजकीय वातावरण भाजप नेता जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून तापले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने भाजपला राज्यात टीकेला सामोरे जावे लागत आहे. तर भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवारंना चालते का ? असा प्रश्न करण्यात येत आहे. त्यामुळे पवार यांच्या समर्थनात घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी फ्लेक्स लावले आहेत.

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनीही काल पुण्यातील पत्रकार परिषदेत जाणता राजा, या शरद पवार यांच्या उपाधीला आक्षेप नोंदवल्यानंतर घाटकोपरमध्ये आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबईचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी शरद पवार यांच्या समर्थनात फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्सवर ‘आपली राजकीय विचारसरणी निश्चित जोपासा पण ज्या नेतृत्वामुळे महाराष्ट्र जगात ओळखला जातो, त्या नेतृत्वाच्या अल्प माहितीवर व अल्प अज्ञानातुन शिंतोडे उडवू नका. शरद पवार कालही, आजही व भविष्यातही आम्हा तरूणांचे जाणता राजा राहतील, असा उल्लेख करण्यात आला आहे.

Leave a Comment