एनएचएआयने एका दिवसात वसूल केला विक्रमी टोल

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) रविवारी तब्बल 86.2 कोटी रुपयांचा टोल टॅक्स गोळा केला आहे. आतापर्यंत एका दिवसात एवढा टोल टॅक्स जमा होण्याचा हा उच्चांक आहे. एनएचएआयचे चेअरमन सुखबीर सिंह संधू यांनी याबाबत माहिती दिली.

टोल टॅक्सासाठी बसवण्यात आलेली इलेक्ट्रिक प्रणाली फास्टॅगद्वारे जानेवारी 2020 मध्ये एका दिवसात सर्वाधिक 50 कोटी रुपये टोल वसूल करण्यात आला. याआधी नोव्हेंबर 2019 मध्ये एका दिवसात इलेक्ट्रिक प्रणालीद्वारे 23 कोटी रुपये टोल वसूल झाला होता.

राष्ट्रीय महामार्ग उत्कृष्टता पुरस्कारावेळी संधू म्हणाले की, एनएचएआयचा 1 दिवसाचा टोल टॅक्स संग्रह रविवारी विक्रमी 86.2 कोटी होता. याशिवाय फास्टॅगद्वारे होणाऱ्या टॅक्स भरणाऱ्यांची संख्या जानेवारीत सरासरी दिवसाला 30 लाख झाली आहे. जुलैमध्ये ही संख्या 8 लाख होती.

डिसेंबर 2019 मध्ये एक कोटींपेक्षा फास्टॅग जारी करण्यात आले. फास्टॅगच्या अंमलबजावणीत सर्वोत्तम कामगिरी जोधपूर टोल नाक्याचे होते. तेथे 91 टक्के टोल फास्टॅगद्वारे भरला गेला. भोपाल व गांधीनगरमधील टोल नाक्यावर फास्टॅगची अमंलबजावणी चांगली झाली.

Leave a Comment