राज्यपाल किरण बेदींचा जावई शोध; म्हणे सूर्यातून येतो ‘ओम’ आवाज


मुंबई : पदुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी ट्विटरवर नासाने सूर्याचा आवाज रेकॉर्ड केला असून त्यातून ‘ओम’ असा आवाज येत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जवळपास चार हजार लोकांनी या व्हिडीओला रिट्विट केले असून अकरा हजारच्यावर लोकांनी लाईक्स केले आहे. बेदी यांना यावरुन अनेकांनी कमेंट करुन त्यांना ट्रोल देखील केले आहे. नासाचा ओरिजनल व्हिडीओ पोस्ट करुन एका युजरने हे बघा, बाय नासा, असा उपहासात्मक टोला लगावला.

ताऱ्यांना जसा प्रकाश असतो, तसा त्यांचा आवाजही असतो. यावर अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने संशोधन करुन सूर्याचा आवाज रेकॉर्ड केला आहे. याविषयीचा व्हिडीओ नासामधील सायन्स डिरेक्टर अलेक्झा यंग यांनी त्यांच्या संकेतस्थळावर पोस्ट केला आहे. याची सविस्तर माहिती यामध्ये दिली आहे. आपली आकाशगंगा माजी आयपीएस अधिकारी आणि पदुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी केलेल्या ट्विट केलेल्या व्हिडीओत दिसत असून केंद्रस्थानी सूर्य आहे. सूर्याचा आवाज नासाने रेकॉर्ड केला असून त्यात ओम, असा आवाज येत असल्याचे म्हटले आहे.


प्रचंड प्रमाणात सूर्यामध्ये उर्जा आहे, या उर्जेमुळे लहरी तयार होतात. या लहरींचा आवाज येतो. पण उच्च वारंवारतेच्या या लहरी असल्याने मानवाला ऐकू येणे शक्य नाही. एक आवाज या लहरींमधून येतो, जो ओम सारखा असल्याचा दावा या व्हिडीओमधून करण्यात आला आहे.

किरण बेदी यांना या व्हिडीओमुळे अनेकांनी ट्रोल केले आहे. तुम्हाला आम्ही बुद्धीवान समजत होतो, पण आमचा भ्रमनिरास तुम्ही केल्याचे एका युजरने म्हटले आहे. तर, अनेकांनी ऋतिक रोशनचा चित्रपट कोई मिल गयाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. माँ मेरी शक्तीओं का गलत इस्तमाल किया, असेही मीम्स देखील एकाने शेअर केले आहे. त्यांच्या व्हिडीओचे काही युजर्सने समर्थनही केले आहे. पण, मजेशीर मीम्स शेअर करत अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. एका युजरने नासाचा ओरिजनल व्हिडीओ पोस्ट करत नासा बाय…असा टोला लगावला आहे.

Leave a Comment