मलंगच्या नव्या पोस्टरमध्ये आदित्य-दिशाची सिझलिंग केमिस्ट्री


मलंग या चित्रपटात दिशा पटनी आणि आदित्य रॉय कपूर यांची सिझलिंग केमिस्ट्री आपल्या पाहायला मिळणार असल्यामुळेच हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 6 जानेवारीला मलंग चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. तर, 7 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. दरम्यान या चित्रपटाचे नवीन पोस्टर आज रिलीज करण्यात आले आहेत. दिशा पटनी आणि आदित्य रॉय कपूरला किस करताना या पोस्टरमध्ये दिसत आहे.


दिशा आणि आदित्य यांनी मलंगसाठी खुप मेहनत घेतली आहे. दोघांनी या चित्रपटासाठी अंडर वॉटर किसिंग सीनचे ट्रेनिंगही घेतले होते. त्याचबरोबर या चित्रपटाच्या एका दृश्यासाठी दिशा आणि आदित्य यांना एक मिनिटला पाण्याखाली रहावे लागले होते.


चित्रपटाची यापूर्वीही अनेक पोस्टर्स रिलीज करण्यात आली आहेत. आदित्य एका पोस्टरमध्ये चिडलेला दिसत आहे. आदित्यने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्टर शेअर केले आणि लिहिले की, प्रेमाप्रमाणेच प्रेमाचा द्वेषही पवित्र आहे. दरम्यान चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये दिशा पटनीही शानदार अंदाजात दिसत आहे.


6 जानेवारीला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी एकत्र केली आहे. आदित्य, दिशाशिवाय या चित्रपटात अनिल कपूर आणि कुणाल खेमूसुद्धा आहेत. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटात अनिल कपूर पोलिसांच्या भूमिकेत असू शकतात अशी बातमी आहे. काही दिवसांपूर्वी अनिल कपूरचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत अनिल पोलिसाच्या वेशात दिसला होता.

Leave a Comment