आनंद महिंद्रांवर आजीबाईंच्या डान्सची भूरळ


गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा असणाऱ्या आनंद महिंद्रा कायम पुढे असतात. त्यामुळे त्यांच्याविषयी रोज काही ना काही चर्चा रंगतच असते. त्याचबरोबर सोशल मीडियावर ते नेहमीच सक्रिय असतात. त्यांनी केलेले प्रत्येक ट्विट हे चर्चेचा विषय असते. त्यांनी अलिकडेच ट्विटरवर एका आजीबाईंचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करत विकेंडचा मूड या व्हिडीओने तयार केल्याचे कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले आहे.


२०२० या नवीन वर्षाला सुरुवात झाली असून नवीन वर्षाचे प्रत्येकानेच उत्साहात स्वागत केले. आनंद महिंद्रांनीदेखील यात त्यांचे नवीन वर्ष एका खास व्यक्तीसोबत सेलिब्रेट केले. यावेळचे त्यांचे फोटोही चर्चेत आल्यानंतर नवीन वर्षाच्या पार्टीची तयारी करणाऱ्या एका आजीबाईंचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला. आजीबाई या व्हिडीओत त्यांच्याच धुंदीमध्ये मस्त डान्स करताना दिसत आहेत.

व्हिडीओ आणि मेसेजच्या माध्यमातून तुमच्याप्रमाणेच अनेकांनी मला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा या सगळ्यामध्ये टॉप पॉप अप व्हिडीओ आहे. मला माहित नाही यातील ही महिला कोण आहे आणि हा व्हिडीओ कुठून आला आहे. पण माझा विकेंडचा मूड या व्हिडीओमुळे झाला आहे. त्यामुळे मी आता जेव्हा घरी जाईन तेव्हा सगळ्या पहिले या महिलेने केलेल्या डान्स स्टेप्सची प्रॅक्टीस करेन, असे आनंद महिंद्रा यांनी आपल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment