अमेरिकेचा दुसऱ्या दिवशीही इराकवर एरिअलस्ट्राईक


बगदाद – सलग दुसऱ्या दिवशी इराकवर अमेरिकेन लष्कराने एरिअल स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत सहा जणांचा या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. शनिवारी बगदादजवळील ताजी रोजनजीक हा अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी भारतीय वेळेनुसार हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटन आणि इटलीच्या सैन्याचे तळही या ठिकाणी असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दोन गाड्यांवर या हवाई हल्ल्यात निशाणा साधण्यात आला. इराण समर्थक मिलिशिया हश्‍द अल-शाबीचे काही लोक या गाड्यांमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. या गाडीतील सहाही जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप त्यांची ओळख पटली नसल्याचे इराक सरकारी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हशद-अल-साबीच्या कमांडरला लक्ष्य करून अमेरिकेने हा हल्ला केला होता. या हल्ल्याच्या वृत्ताला इराकमधील सरकारी माध्यमांनीदेखील दुजोरा दिला आहे.

Leave a Comment