कंगनाची बहिण रणवीर सिंहला म्हणाली खोटारडा


सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कंगना राणावतची बहिणी रंगोली कायम कंगनाची पाठराखण करत असते. ती निर्भीडपणे तिचे मत ट्विटरवर मांडत असते. आतापर्यंत बऱ्याच कलाकारांवर तिने ताशेरेदेखील ओढले आहेत. आता यामध्ये तिने अभिनेता रणवीर सिंगवर टीकेची तोफ डागली आहे. तिने अभिनेता रणवीर सिंह खोटारडा असल्याचे म्हटले आहे.


अलिकडे रणवीरच्या लहानपणीचा फोटो एका नेटकऱ्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याच्यासोबत या फोटोमध्ये सोनम कपूर आणि रणबीर कपूरदेखील दिसून येत आहे. फोटो शेअर करुन, रणवीर खोटारडा असून तो लहानपणापासून रणबीर आणि सोनमला ओळखत असल्याचे म्हटले आहे. रंगोलीने हा फोटो पाहिल्यानंतर लगेच त्यावर तिची प्रतिक्रिया दिली.

ज्यांचे आई-वडील श्रीमंत असतात. ज्यांची एक ओळख असते आणि संधी उपलब्ध असतात असे लोक बाहेरुन आलेले नसतात. उलट जे लहान गावातून येतात, ज्यांना नीट इंग्लिश बोलता येत नाही आणि त्यांचे शिक्षणदेखील साध्या शाळेत झालेले असते. तसेच ज्यांच्याकडे डिझायनर कपडे नसतात, त्यांना चुकीची वागणूक दिली जाते ते बाहेरुन आलेले असतात, असे रंगोली म्हणाली. ती पुढे खोचकपणे म्हणते, सहानभूतीची आणि अटेंशनची या तीन विद्वान व्यक्तींना गरज आहे. चला तर मग या गरजूंची आपण मदत करुया.

Leave a Comment