नवीन वर्षाचे स्वागत करत असल्याचा एक रोमँटिक व्हिडिओ अभिनेत्री सोनम कपूरने शेअर केला असून ती यात पती आनंद आहुजाचे चुंबन घेताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये सोनम कपूर आणि आनंद आहुजा चर्चित जोडपे असून दोघेही नेहमी सुट्टीचा आनंद लुटताना दिसत असतात. त्यासोबतच नेहमी याचे अपडेट्स सोशल मीडियावर देत असतात.
तिने शेअर केलेल्या रोमँटिक व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, गेले दशक खूप शानदार होते. काही चांगल्या मी चित्रपटात काम केले, येथे मला अनेक चांगल्या लोकांशी ओळख झाली, माझे जे आयुष्यभराचे मित्र बनले. रिया कपूरसोबत मी चित्रपट केला. तेव्हा लक्षात आले की आम्ही बहिणी उत्तम पार्टनरही होऊ शकतो. माझा जीवनसाथी आनंदला मी भेटले आणि त्याच्यासोबत संसार सुरू केला. आयुष्याचे अनेक रस्ते आहेत मात्र एकच निवडला पाहिजे, हे मला या दशकाने शिकवले. माझ्या परिवाराला आणि मित्रांना धन्यवाद.