फिरण्यासाठी व्हा तयार, या वर्षी विकेंडला जोडून आहेत अनेक सुट्ट्या

Image Credited – Wrike

नवीन वर्षाची सुरूवात झाली असून, प्रत्येक घरातील कॅलेंडर आता बदलले असेल. कॅलेंडरमधील सर्वात पहिली गोष्ट आपण पाहतो ती म्हणजे नवीन वर्षात सुट्ट्या कोणत्या तारखेला आहेत. 2020 मध्ये देखील अनेक असे लाँग विकेंड अर्थात साप्ताहिक सुट्ट्या आहेत, ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. यावर्षी अनेक 3-3 दिवसांच्या सुट्टया आहेत. तर अनेकदा या सुट्या तुम्ही 4 दिवसांच्या देखील घेऊ शकता.

यावर्षी 8 सुट्ट्या अशा आहेत, ज्या एकतर शुक्रवारी अथवा सोमवारी आहेत. याचाच अर्थ तुम्हाला सरळ 8 मोठे विकेंड मिळत आहेत. महाशिव रात्री, गुड फ्राइडे, ईद आणि गुरू नानक जयंती शुक्रवार अथवा सोमवारी येत आहे. वर्षातील सर्वात पहिली सलग सुट्टी महाशिव रात्रीला 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.

यावर्षी 4 सुट्ट्या ह्या मंगळवार अथवा गुरूवारी आहेत. म्हणजेच तर तुम्ही सोमवार अथवा शुक्रवारी देखील सुट्टीसाठी अर्ज केला तर तर तुम्हाला वर्षातून 4 वेळा 4 दिवसांच्या सुट्टया मिळतील. या सुट्टयांमध्ये तुम्ही बाहेर फिरायला जाऊ शकता.

मात्र यंदाच्या वर्षी अनेक सुट्ट्या अशा देखील आहेत, ज्या शनिवार अथवा रविवारी येत आहेत. यंदा 5 सुट्या ह्या आठवड्याच्या शेवटी येत आहेत. या सर्व सुट्ट्या प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, दसरा आणि दिवाळीलाच आहेत.

Leave a Comment