रशियन सुंदरी बंदीनंतर पुन्हा टेनिस कोर्टवर परतणार!


ब्रिस्बेन – लवकरच ५ ग्रँडस्लॅम विजेती आणि माजी अव्वल मानांकित रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हा पुनरागमन करणार आहे. २०२० मध्ये ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून शारापोव्हा आपल्या मोहिमेची सुरुवात करणार असून तिची या स्पर्धेत वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

डोपिंगप्रकरणी बंदी संपुष्टात आल्यानंतर शारापोव्हाला २०१९ मध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे त्रास झाला होता. ती त्यामुळे बराच काळ मैदानाबाहेर होती. केवळ ८ स्पर्धा आणि १४ सामने तिला खेळता आले. शारापोव्हा सामन्यांचे प्रमाण कमी असल्यामुळे जागतिक क्रमवारीत १३३ व्या स्थानी पोहोचली.

सेरेना विल्यम्सकडून यूएस ओपनमधील झालेल्या पहिल्या फेरीतील पराभवानंतर शारापोव्हा मैदानात उतरली नव्हती. पण, ती आता ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. या स्पर्धेत जर तिला चांगली कामगिरी करता आली, तर ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतील तिचा सहभाग निश्चित होईल. शिवाय, कुयोंग क्लासिक स्पर्धेतही खेळण्याची इच्छाही शारापोव्हाने व्यक्त केली आहे.

Leave a Comment