भडकलेल्या राज्यपालांनी काँग्रेस मंत्र्याला पुन्हा घ्यायला लावली शपथ


मुंबई – आज राज्याच्या ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या शपथविधी दरम्यान काँग्रेसचे आमदार के. सी. पाडवी यांच्यावर भडकले. शपथ घेतल्यानंतर के. सी. पाडवी मनोगत व्यक्त करत असताना राज्यपालांनी त्यांना अडवले आणि त्यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितली. इतर नेत्यांनी या प्रकारानंतर नियमानुसार शपथ घेतली.

याअगोदर 28 नोव्हेंबर रोजीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी अशाचप्रकारे शपथ घेतली होती. राज्यपालांनी त्यावेळी देखील नाराजी वर्तवली होती. नियम आणि कार्यपद्धतीचे आमदारांनी उल्लंघन करत राज्यपालांकडून शपथ सुरु करण्यापूर्वी आपआपले नेते आणि देवांचे नाव घेतले होते. राज्यपालांनी पुढील कोणत्याही कार्यक्रमात तसे न करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या. पण आज के. सी. पाडवींकडून तसा प्रकार घडला.

महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये तिन्ही पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांना समाविष्ट केले जात आहे. धर्मनिरपक्षेतेच्या तत्तावर स्थापित झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या या मंत्रिमंडळात सर्वच समुदायाच्या नेत्यांना जागा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरीही काही नेत्यांमध्ये आपल्याला मंत्रिमंडळात स्थान नाही मिळाल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. तर काहींनी चक्क राजीनामा देण्याची तयारी सुद्धा दर्शवली आहे. नवीन मंत्रिमंडळात अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आहे.

Leave a Comment