धोक्याच्या क्षणी आता महिलांना वाचवणार ही ‘सँडल’

Image Credited – Forbes

महिलांसोबत घडलेल्या हिंसा आणि अत्याचारांच्या घटनांबद्दल आपण दररोज ऐकत असतो. अशा परिस्थितीत महिलांच्या सुरक्षेसाठी बनारसच्या एका युवकाने एका तंत्राचा शोध लावला आहे. बनारसच्या श्याम चौरसियाने सँडलमध्ये सहज बसणारे असे तंत्र शोधले आहे, ज्याने अडचणीत सापडलेली महिला अगदी पायाच्या इशाऱ्याने पोलिसांना बोलवू शकेल.

श्यामने सँडलच्या सोलमध्ये सेंसर डिव्हाईस फीट करून ‘स्मार्ट अँटी रेप सँडल’ तयार केले आहे. हे सँडल परिधान केल्यावर महिलांना धोक्याच्या वेळी पर्समधून फोन अथवा कोणालाही कॉल करण्याची आवश्यकता नसेल. त्यांना केवळ पायाच्या बोटांनी सँडलमध्ये लावलेल्या स्विचला सतत दोनवेळा दाबावे लागेल. असे करताच ब्लूटूथच्या माध्यमातून स्मार्टफोन अनलॉक होईल व आपोआप 112 अथवा शेवटच्या डाइल क्रमांकावर फोन लागेल व मदत येईल. घटनास्थळाची ऑडिओ रेकॉर्डिंग देखील समोरील व्यक्तीच्या मोबाईलमध्ये होईल.

परवानगीसाठी सेंसरयुक्त डिव्हाईसला आयआयटी-बीएचयू येथील इंक्यूबेशन सेंटरमध्ये सादर करण्यात आले आहे.

असे काम करते स्मार्ट सँडल –

सँडलमध्ये लावलेले वायरलेस सेंसर डिव्हाईसला ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनशी कनेक्ट करावे लागते. अंगठ्याजवळ दिलेल्या एका छोट्या स्विचला दोनवेळा दाबल्यास मोबाईल अनलॉक होऊन शेवटच्या डाइल नंबरवर आपोआप कॉल लागेल.

सँडलमध्ये लावलेल्या 3 माईकद्वारे दुसऱ्या बाजूला महिला व इतर गोष्टींचा आवाज स्पष्ट ऐकू येईल. 2500 एमएएच लिथियम बॅटरी लावलेली असल्याने एकदा चार्ज केल्यावर हे 4 ते 6 महिने सहज चालेल. हे सँडल आणि डिव्हाईस तयार करण्यास 4 महिने व 9500 रुपये खर्च आला.

 

Leave a Comment