2020 मध्ये मोबाईल बँकिंग आणि ई-कॉमर्सवरील सायबर हल्ल्यात वाढीची शक्यता

Image Credited – Forbes

नवीन वर्षात सर्वाधिक सायबर हल्ले मोबाईल बँकिंग आणि ई-कॉमर्सवर होतील, असा अंदाज सायबर सुरक्षा सॉफ्टवेअर बनवणाऱ्या एका प्रमुख कंपनीने केला आहे. कंपनीचा दावा आहे की, नवीन वर्षात शेअर मार्केटच्या गुंतवणुकीवर काम करणारे अॅप, ऑनलाईन असलेला आर्थिक डेटा प्रोसेसिंग सिस्टम आणि क्रिप्टोकरेंसींना देखील या हल्ल्यात नुकसान होईल.

कंपनी कॅस्परस्कीनुसार, 2019 मध्ये सायबर हल्ल्यांना समजण्यास मदत मिळाली होती. याच्या आधारावर भविष्यातील धोक्याचा अंदाज लावण्यात आला आहे.

मोबाईल अॅप सुरक्षेसाठी कोणतेही पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे मोबाईल बँकिंग अॅपचे सोर्स कोड लीक होणे आणि यामुळे सर्वसामान्य व्यक्तीच्या डेटाचा गुन्ह्यांसाठी वापर होऊ शकतो. हे हल्ले आधी झालेल्या जीएस आणि स्पायआय सारखे असतील.

रिपोर्टनुसार, आफ्रिका, पुर्व यूरोप आणि आशियातील काही देशांमध्ये असे समूह काम करत आहेत, जे बँकेच्या नेटवर्कपर्यंत पोहचून ते गुन्हेगारांना विकू शकतात. त्यांचे लक्ष्य छोट्या बँका आणि मोठ्या उद्योग समुहांतर्फे खरेदी करण्यात आलेले आर्थिक संस्था आणि कंपन्या असतील.

याशिवाय मोठे हल्ले ऑनलाईन पेमेंट प्रक्रियेवर देखील होतील. हॉस्पिटल आपल्या रुग्णांचा डेटा ऑनलाईन साठवू लागले आहेत, तसतसे त्यांची सायबर चोरी वाढू शकते.

Leave a Comment