पी हळद आणि हो बरी


मराठीत एक म्हण आहे. पी हळद अन हो गोरी. या म्हणीचा अर्थ काही वेगळा आहे. कोणत्याही उपायाचा परिणाम पटकन होत नसतो. हळद प्याल्यावर लगेच कोणी गोरी होत नसते असे या म्हणीतून सुचवायचे आहे पण प्रत्यक्षात मात्र हळद ही काही बाबतीत चटकन आणि बराच गुण देणारी आहे. असे काही प्रयोगातही दिसून आले आहे. काही लोकांनी हळद मिसळलेले पाणी दररोज सकाळी प्राशन करून त्याचे फायदे नांेंदवले आहेत तर काहींनी हळदीचा चहा किती गुणकारी असतो याचा अनुभव घेतला आहे. दररोज सकाळी साधारण ग्लासभर पाणी घ्यावे. ते गरम करावे आणि कोमट झाल्यावर त्यात अर्धा चमचा हळद मिसळावी. हे पाणी थंड झाल्यावर प्यावे त्याचे अनेक फायदे होतात.

हळद ही जंतुनाशक असते. त्यामुळे ती अनेक रोगांचा सामना करण्यास उपयोगी पडते. काही वेळा ती काही रेडिएशन्सचाही प्रतिकार करण्यास फायदेशीर ठरली आहे. सध्या आपण मोबाईल फोेन फार वापरतो आणि त्याच्या रेडिएशन्सचा आपल्यावर काही परिणाम होण्याची शक्यता असते. आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हळद वापरायला मिळाली तर अशा परिणामांपासून आपण दूर राहू शकतो. हळद पाण्यात मिसळून प्यावी किंवा आहारात तिचा समावेश अवश्य होईल याची दक्षता घ्यावी. आपल्या समाजात दूध आणि हळद पिण्याची पद्धत आहे. त्यामुळे बसलेला घसा मोकळा होतो. घशाला कसला संसर्ग झाला असेल तर हळद आणि दूध गुणकारी ठरते. खोकला आल्यावर तर हळद आणि दूध घेतातच. ते घेतल्यावर दुसरे कसलेही औषध घेण्याची गरज नाही असे मानतात.

काही लोक हळदीचा चहा तयार करतात. तो तयार करण्याची पद्धत आहे. कपभर पाण्यात चमचाभर हळद टाकून हे मिश्रण उकळा. नंतर त्याला खाली उतरवून त्यात थोडा मध टाका. त्याशिवाय त्यात थोडे लिंबू पिळा किंवा त्यात संत्र्याचा रस मिसळा. त्यामुळे या मिश्रणाला चांगली चव येईल. असा हा चहा प्याल्याने वजन कमी होेण्यास मदत होते. संधीवाताचा त्रास कमी होतो. शिवाय यात काही मिनरल्स रोगप्रतिकारक आणि कर्करोगास प्रतिबंध करणारे आहेत. जगाच्या काही भागात हळदीचा असा चहा फार लोकप्रिय आहे. कारण त्यामुळे मधुमेहाचा उपद्रव कमी होतो. हळद हे अगदी सहजगत्या उपलब्ध होणारे औषध आहे. त्याचा वापरही आपण करीत असतो पण त्याचे अनेक फायदे आपल्याला माहीतही नसतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment