व्हिडीओ – हा आहे देखणा परी महाल !

fairy
‘द शिकागो म्युझियम ऑफ सायन्स अँड इंडस्ट्री’ येथे एक अतिशय देखणी, नजर ठरणार नाही अशी ‘मिनिएचर’ वास्तू आहे. या वास्तूला ‘अ फेरी कासल’ म्हणजेच परीचा महाल म्हटले जात असून याची रचना १९२० साली करण्यात आली होती. एलिनोर रूजवेल्ट, ऑरविल राईट, अल्बर्ट आईनस्टाईन, पाब्लो पिकासो, राणी एलिझाबेथ यांच्यासारख्या मातब्बर व्यक्तीमत्वांच्या स्वाक्षऱ्या या फेरी कासलमधील ‘मिनिएचर व्हिजिटर्स बुक’मध्ये आहेत. या फेरी कासलला ‘कोलीन मूर्स फेरी कासल’ म्हटले जाते.
fairy1
या महालामध्ये पऱ्यांचे वास्तव्य असून, त्या तेथून काही कामानिमित्ताने घाईगडबडीत बाहेर पडल्या असाव्यात असे भासविणारा हा महाल आहे. पऱ्या वाचीत असलेली पुस्तके, स्वयंपाकघरामध्ये विस्तवावर असलेली चहाची किटली, आणि भोजनासाठी सिद्ध केले गेलेले आणि सजविलेले टेबल पाहून आता कोणत्याही क्षणी पऱ्यांचे आगमन होईल असे हा महाल पाहणाऱ्याला भासते.
fairy2
हा परी महाल जिने बनवविला ती कोलीन मूर अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री होती. हा परी महाल बनवून घेण्यासाठी तिने तत्कालीन नामवंत डिझायनर्स आणि स्थापत्यविशारदांची मदत घेऊन हा परीमहाल उभा करविला. या परीमहालाच्या निर्मितीला १९२८ साली सुरुवात झाली असून, त्याकाळी हा महाल बनविण्यासाठी ५००,००० डॉलर्सचा खर्च आला. आजच्या काळामध्ये या महालाची किंमत कोट्यवधी डॉलर्स आहे. हा महाल बनविताना हस्तीदंत, ओपाल, अलाबास्टर, इत्यादी मौल्यवान सामग्रीचा वापर करण्यात आला आहे.

(व्हिडीओ सौजन्य – Atlas Obscura)
या महालाची निर्मिती १९३० साली पूर्ण झाली. त्यानंतर हा महाल प्रदर्शित करण्यासाठी कोलीनने अनेक शहरांमध्ये प्रदर्शने भरविली. हा महाल एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी रेल्वेचे तीन कोच आरक्षित केले जात असत. एकूण चाळीस शहरांमध्ये निरनिराळ्या वेळी हा महाल प्रदर्शित करण्यात आला होता.

Leave a Comment